आमची यशोगाथा
जामसर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ९९% आदिवासी लोकवस्ती असलेले प्रगतशील गाव आहे.जामसर पैकी देवतळी येथे प्रसिद्ध सोयमभू महादेवाचे मंदिर आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३२७९ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ०५ , अंगणवाडी केंद्रे ०८ व व्यायामशाळा ०२ सभामंडप-२ आणि बहुउद्देशीय केंद्र -०१ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ०५ मंदिरे, सामुदायिक सभागृह ०१, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून,भात,नागली व वरई,उडीत,तुर,कुळीद ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा या फळपिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते
जामसर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जामसर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.
ग्रामपंचायत लोकनियुक्त अध्यक्ष , उपअध्यक्ष व १३ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
जामसर गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
जामसर हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ०७ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ ८९४.७५६ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ०३ महसूल गाव आहेत. एकूण ८४५ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३२७९ आहे. त्यामध्ये १६७९ पुरुष व १३६३ महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत जामसर हद्दीत ०३ महसुली गावे व ०६ पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून ०१ km अंतरापर्यंत वसलेले आहेत.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच जामसर ग्रामपंचायत
गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर जव्हार शहराला पाणीपुरवठा करणारा खडखड धरण आहे. जामसर येथे १५.५ एक्कर चे पाझर तलाव असून १२ हि महिने पाणी या तलावाचे आटत नाही शिवाय जामसर येथे घोड विहीर हि खूप प्राशिध्द आहे कि त्या ठिकाणी रामाची चरण उमटले आहेत .आणि देवतळी गाव असे आहे कि त्या ठिकाणी पुरातन काळापासून दगडाच्या सिलालेख आपणास बघण्यास मिळतात .शिवाय जामसर पैकी सुर्यानगर येथे प्रसिध्द म्हणुन धोमझारा खूप प्रसिध्द आहे . पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो व बाहुपाडा हे गाव भाजीपाला उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १८°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते. जामसर क्षेत्रातील भाजीपाला, काजू,आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
लोकजीवन
जामसर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भाजीपाला,काजू,आंबा, व हंगामी भात,नागली,वरई पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
जामसर च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.